(रत्नागिरी)
गुहागर तालुक्यातील सातवे त्रिशुळ येथील विवाहितेने मानसिक आजाराला कंटाळून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना बुधवार, २७ मार्च रोजी सकाळी ८.१५ वा. घडली असून उपचारादरम्यान सायंकाळी तिचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
श्वेता महेश माटल (३८, रा. सातवे त्रिशुळ म्हसकरवाडी गुहागर) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. श्वेता माटल ही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होती. बुधवारी सकाळी तिचा पती महेश माटल याने घरात चहा केला होता. त्यानंतर तो बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर गेला असताना श्वेताने घरातील कपड्यांचा ढीग पेटवून त्यात स्वतःला झोकून दिले. काही वेळाने तिचा पती घरी परतला असता त्याला घरात सर्वत्र धूर दिसला. त्याने धावत घरातील स्वयंपाक घर गाठले असता त्याला श्वेताच्या गाउनने पेट घेतल्याने ती जमिनीवर लोळताना दिसून आली. महेशने तातडीने श्वेताला गुहागर प्रा. आ. केंद्रात नेऊन जिल्हा रुणालयात दाखल उपचार सुरू असताना मृत्यू झाला