(फुणगूस / एजाज पटेल)
उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक थंड पिण्याकडे ओढ घेतात. सध्या वातावरणात सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र कडक ऊन पडत आहे. सकाळी थोड्याफार थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा पिण्यासाठी पसंती देत असले तरी दुपारी पडत असलेल्या कडक उन्हात रस पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांसह मोठ्यांचीही पावले शीतपेय व रसवंतींकडे वळू लागतात.
स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आतमध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत.
उन्हाळ्याची चाहूल लागली की, शहरासह ग्रामीण भागात जागोजागी थाटलेल्या रसवंती सहज नजरेस पडतात. सध्या थंडीने जवळपास काढता पाय घेतला असून उन्हाची चाहूल लागली आहे. दुपारी पडत असलेल्या उन्हामुळे परिसरातील अनेक भागात रसवंती थाटत असल्याचे दिसून येत आहे. अशातच काही ठिकाणी रसवंती सुरूही झाले असून घुंगरांचा मंजुळ आवाज कानी पडत आहे.
माणसाच्या शरीरातील रक्त गोठविणारी गुलाबी आणि जीवघेणी थंडी जवळपास आता संपत आली आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक ऊसाच्या रसाचा आधार घेतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या रसवंतीचे घुंगरू वाजायला सुरुवात झाली असून नागरिक रस पिण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असतात लग्नाला जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात धडपड असते. कुणाचा तडाका व या धावपळीतून कुठेतरी पाच मिनिटे थांबून ग्लासभर रस पोटात टाकला की उन्हाची काहीली काही प्रमाणात का होईना शांत होण्यास चांगलीच मदत मिळते.
कोक पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी उसाचं रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता कमी होत नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सिझनध्ये चालणारा आरोग्यदायी उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच असे बुजुर्ग आवर्जून सांगतात.
आरोग्याच्या दृष्टीने उसाचा रस फायदेशीर
आरोग्याच्या दृष्टीने उसाचा रस फायदेशीर असतो आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी त्याची मदत होते. शिवाय शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी देखील चांगल्या प्रकारे उपयोग होऊन पोटासाठी गुणकारी म्हणून उसाच्या रसाला मान्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात रसवंती वर रस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
ऊसाचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी फार फायद्याचा आहे. याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहाते. ऊसाच्या रसाने पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर पडतात. ऊसाच्या रसात असलेले अँटिऑक्सिडंट्स, एन्झाइम आणि अनेक पोषक तत्व लिव्हरला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. हे लिव्हरमध्ये असलेले टॉक्झिक पदार्थ काढण्यास मदत करतात आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स करतात. ऊसाच्या रसाने शरीरात जास्त उर्जा निर्माण होते. आणि अशक्तपणा दूर होतो. उसाच्या रसाने वजन कमी होतं. यात शुगर लेव्हल कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
ऊसाचा रस किडनीसाठी फार फायद्याचा आहे. शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढत शरीरात यूरिन बनवण्याचं काम करतात. हे एक नॅचरल डायूरेटिक असतं. जे मूत्रमार्गाद्वारे शरीरातील घातक पदार्थ शरीराबाहेर काढते. किडनीच्या आत दडलेला मळसुद्धा बाहेर काढण्यासही ऊसाचा रस फायद्याचा ठरतो. ऊसाचा रस बॉडीला हायड्रेट करते. याने हीट स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. ऊसाचा रस शरीर थंड ठेवण्यास मदत करते. ऊसाचा रस स्किनसाठीही फार चांगला असतो. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी-६ स्किनला हेल्दी ठेवण्यास मदत करते. ऊसाच्या रसात अँटी एजिंग गुण असतात. जे तुम्हाला वाढत्या वयातही तारूण्य जपण्यास मदत करतात. ऊसाच्या रसात तुम्हाला सशक्त ठेवण्याची क्षमता असते. त्यात विटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि आयरन असते जे शरीराच्या विविध भागांसाठी फार फायद्याचं ठरतं.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1