(चिपळूण)
शहरातील एसटी स्टँड परिसरात देवदर्शन करुन निवासस्थानी जाणाऱ्या वृध्द महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. हा प्रकार शनिवारी (ता. २३) सकाळी हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, पुणे येथील योगिनी यतीश पालकर (६४, रा. पुणे) या शिमगोत्सवासाठी आल्या आहेत. रात्री त्या भोगाळे येथे थांबल्या होत्या. काल सकाळी त्या परमार्थ निकेतन मंदिराम श्री कलावती आई मंदिरात दर्शनासाठी गेल्या. त्यांच्यासोबत एक मुलगी होती. दर्शन आटोपून त्या परत जात असताना एसटी स्टैंडकडे दुचाकीने येणाऱ्या हेल्मेटधारी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पोबारा केला.
यावेळी पालकर यांनी आरडा -ओरडा केला परंतु रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. दरम्यान काहींनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे नजरेच्या टप्प्याआड झाले होते. पालकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. यामध्ये चोरट्यांनी हेल्मेट परिधान केल्याने त्यांचा चेहरे दिसत नव्हते. त्यानंतर चिपळूण पोलिस ठाण्यात पालकर यांनी फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1