कोरोनाचे हे सामान्य संक्रमण असून, 80 ते 90 टक्के बाधितांना रेमडेसिविर वा प्राणवायूची गरज पडत नाही, अशी माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज रविवारी दिली आहे. सध्याच्या घडीला देशभरात कोरोनासंबंधी विविध प्रकारचे गैरसमज आहे. त्यातूनच अनेकांनी आपल्या घरात रेमडेसिविचे इंजेक्शन आणि प्राणवायूचे सिलेंडर ठेवणे सुरू केले आहे. त्यामुळे अन्यत्र त्याची कमतरता जाणवत आहे.
सध्या कोरोनाचे सामान्य संक्रमण असून, 85 ते 90 टक्के लोकांमध्ये असलेल्या साधारण ताप वा सर्दीच्या आजारात रेमडेसिविर किंवा प्राणवायूची गरज नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. सध्या जे बाधित घरीच विलगीकरणात आहेत आणि ज्यांची प्राणवायूची पातळी 94 पेक्षा अधिक आहे, अशांना रेमडेसिविरची कोणतीही गरज नाही. अशा स्थितीत रेमडेसिविर घेतल्यास त्यापासून नुकसान अधिक आणि फायदा कमी होतो.
प्राथमिकरीत्या असे दिसून येते की, लोकांनी भीतीने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा सुरू केला आहे. मात्र, त्यामुळे बाजारात आणि सरकारकडे कमतरता निर्माण झाली. दुर्दैवाने यात काळाबाजारही सुरू झाला. प्राणवायूबाबतही असाच चुकीचा निर्णय घेण्यात आल्याने डॉ. गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली. मेदांता रुग्णालयाचे डॉ. नरेश त्रेहान यांच्यानुसार, रेमडेसिविर हे काही जादूचे इंजेक्शन नाही. ज्यावेळी प्राणवायूची पातळी 95-97 असेल, अशावेळी एकदम प्राणवायू लावता कामा नये. यात धोका होण्याची भीती असते. हलके लक्षणांसोबत कोरोनाबाधित असल्यासही घरातच विलगीकरणात ठीक होता येते.
https://www.tarunbharat.net/Encyc/2021/4/25/90-percent-of-sufferers-do-not-need-oxygen.html