(संगमेश्वर / प्रतिनिधी)
टँकर मधून सहा लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीचा एलपीजी गॅस चोरी प्रकरणी फरार झालेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गॅस चोरी प्रकरणी टँकर चालक शमशाद निषाद खान राहणार उत्तर प्रदेश याला रायगड येथे संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत शुभांक विजेंद्रपाल सिंग , वय ३८ वर्षे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली होती. गल्फ कंट्रीजकडून एल.पी.जी. गॅसची आयात केली जाते . तो गॅस रत्नागिरी येथील जयगड पोर्ट या जेटीवर जहाजाव्दारे येवून सदर ठिकाणाहून गॅस पाईपव्दारे गॅस टँकरमध्ये लोड केला जातो . व तेथून तो भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो . कंपनीचे जयगड पोर्टवर एकूण ३२५ गॅस टँकर आहेत . प्रत्येक टँकरमध्ये जवळपास १८ टन गॅस लोड केला जातो . गॅस भरलेनंतर त्यास आमचे कंपनीचे व जेएसडब्ल्यु कंपनीचे असे दोन सिल होतात . दर दिवशी साधारण १०० टँकर गॅस भरून जयगड येथून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जातात .
कंपनीचा टँकर क्रमांक एमपी ३७ / जीए / १७८५ हा देवून कळंबोली येथून जयगड पोर्टकरीता रवाना झालेला होता , तो जयगड पोर्ट येथे पोहचून तेथून दिनांक १ ९ डिसेंबर २०२२ रोजी ०५.०० वा . सुमारास टँकर क्रमांक एमपी ३७ / जीए / १७८५ मध्ये १७.७५ टन गॅस भरून खोपोली , जि . रायगड येथे पोहचविण्याकरीता निघाला . तो दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी खोपोली , जि . रायगड येथे पोहचणे आवश्यक होते . परंतु तो तेथे पोहचला नाही म्हणून कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी सदर टँकरवरील चालक शमशाद खान यास त्याच्या मोबाईलवर कॉल केले असता तो बंद आला . म्हणून त्यांनी टँकरच्या जीपीएस ची पाहणी केली असता दिनांक १ ९ डिसेंबर २०२२ रोजी ० ९ .५७ वा . ते २१.२६ वा . पर्यंत माभळे , ता . संगमेश्वर येथे थांबल्याचे दिसले व दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी ०१.२७ वा . चिपळूण येथे शेवटचे लोकेशन दिसत होते . म्हणून चिपळूण येथील लोकेशनवर टँकर पाहिले असता त्याठिकाणी टँकर दिसून आलेला नाही . म्हणून त्यांनी आमचे कंपनीचे इतर टँकरवरील चालकांना टँकरबाबत विचारपूस करता त्यांनी टँकर क्रमांक एमपी ३७ / जीए / १७८५ ही पनवेल येथे दिसल्याचे सांगितले .
दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी पनवेल येथे जावून तेथून टँकर ताब्यात घेतला व त्या टँकरमध्ये ज्वलनशीन पदार्थ असल्याने त्यांनी तो टँकर सुरक्षिततेच्या दृष्टीने कळंबोली पार्किंग येथे घेवून गेले , कळंबोली येथे जाताना मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी त्या टँकरचे वजन केले असता त्याचे गॅस टँकर व एल.पी.जी. गॅसचे एकूण वजन २३.३६० टन भरले . त्यावेळी त्यांची खात्री झाली की , सदर टँकरचे गॅससह एकूण वजन ३४.८६ टन भरणे आवश्यक होते . परंतु त्यामध्ये ११.५०० टन वजनाचे एल.पी.जी. गॅस कमी असल्याचे दिसले . म्हणून त्यांनी मला त्याबाबत कळवून त्याची कागदपत्रे पाठविली . त्यावेळी सदरची कागदपत्रातील टँकरचे जीपीएस पाहिले असता दिनांक १ ९ डिसेंबर २०२२ रोजी ० ९ .५७ वा . ते २१.२६ वा . पर्यंत माभळे , ता . संगमेश्वर येथे सुमारे ११ तास टँकर उभा असल्याचे दिसले टँकर क्रमांक एमपी ३७ / जीए / १७८५ मधील एल.पी.जी गॅसची चोरी केलेली आहे .
सदर गॅस टँकरमधून ६,६१,७१० / – किमतीचे टँकर क्रमांक एमपी ३७ / जीए / १७८५ मधील ११.५ टन वजनाचा एल.पी.जी. गॅस त् किंमतीचा गॅस कंपनीच्या जबाबदार व्यक्तींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरीला गेला होता.याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी चालक शमशाद खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र चालक गेले दिवस फरार होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता सुतार उपनिरीक्षक नागरगोजे आदींनी पोलीस सचिन कामेरकर पी टी कांबळे मणवळ ,खोंदल यांची टीम पाठवली. पोलिसांनी आरोपी शमशाद खान याला खालापूर पोलीस ठाणे रायगड येथील स्टील कंपनीत जाऊन अटक केली. ६ लाख ६१ हजाराच्या गॅस चोरी प्रकरणी आणखी काही बड्या व्यक्ती यामध्ये गुंतल्या असल्याची शक्यता असून त्यांची नावेही आता पुढे येणार आहेत.