(रत्नागिरी)
कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात असल्यामुळे चाकरमान्यांची पावले गावाकडे वळू लागली आहेत. मुंबईतून येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा वाहनांची उपलब्धता राज्य परिवहन रत्नागिरी विभागाने केली आहे. मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी ५०, तर परतीसाठी ५४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कोकणात गणेशोत्सव व शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्याप्रमाणे शिमगोत्सवासाठीही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात तेरसे व भद्रे शिमगे साजरे करण्यात येतात. २४ मार्चला होळी, २५ ला धुलिवंदन आहे. यालाचे भद्रेचे शिमगे म्हटले जातात. या शिमग्याच्या दोन दिवस आधी तेरसे शिमगे (ता. २२) साजरे होणार आहेत. त्यामुळे २० मार्चपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी विभागातील नऊ आगारांत जादा गाड्या येणार आहेत. त्याप्रमाणे परतीसाठीही जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, बोरीवली, नालासोपारा, विठ्ठलवाडी, ठाणे, परळ, भांडूप, स्वारगेट, कल्याण, भिवंडी, विरार, चिंचवड येथून जादा गाड्या येणार आहेत. तसेच परतीसाठीही जादा गाड्या येणार आहेत. २० मार्चपासून दापोली आगारात १३, खेडमध्ये ८, चिपळुणात ६, गुहागरात २, देवरुखात ३, रत्नागिरीत ५, लांजा ४, राजापुरात ३, तर मंडणगडात ६ मिळून एकूण ५० जादा गाड्या येणार आहेत. परतीसाठी दि. २५ मार्चपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दापोलीतून १५, खेडमधून ९, चिपळूण ६, गुहागर २, देवरुख ३, रत्नागिरीतून ६, लांजा ४, राजापुरातून ३, मंडणगडातून ६ गाड्या मिळून एकूण ५४ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1