(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी नं १ केंद्र शाळेतील इ.७ वी मधील अभ्यासू विद्यार्थीनी कु. श्रावणी सिद्धार्थ जाधव या गुणवंत विद्यार्थीनीची राज्य व राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी रत्नागिरी तालुक्यातून उच्च प्राथमिक गटातून निवड झाली असून गेले तीन दिवस ती राज्यातील विविध ऐतिहासिक सांस्कृतिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याच्या विशेष अभ्यास दौऱ्यात सहभागी झाली आहे.
समग्र शिक्षा राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्य व राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याकरिता श्रावणी सिद्धार्थ जाधव हिची निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक अध्ययन निष्पत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे.उच्च प्राथमिक गटातून जि .प .शाळा गावडे-आंबेरे खारवीवाडा न.२ या शाळेतील कु.आराध्य योगेश नाटेकर या विद्यार्थ्यांचीही या अभ्यास दौऱ्यात निवड झाली आहे.
ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक प्रेक्षणीय अशा विविध स्थळांचा या अभ्यास दौऱ्यात सामावेश आहे. ओरीतील श्रावणी जाधव हिच्या निवडीबद्दल रत्नागिरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ.प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते, केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक श्री.रामदास चव्हाण, श्री.गणपती पडुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत उर्फ बंड्या देसाई, गावच्या सरपंच सौ. स्वाती उदय देसाई, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला देसाई यांसह पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक यांनी श्रावणी जाधव तिच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1