(रत्नागिरी)
गणपतीपुळे येथील जागा विक्री करण्याच्या बहाण्याने महिलेची 56 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुग्धा सामंत (रा. आठवडा बाजार रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. फसवणूक प्रकरणी मुग्धा यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत खेडेकर (रा. सोनवडे ता. संगमेश्वर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीत याने आपल्या भावाच्या उपचारासाठी गणपतीपुळे येथील चार गुंठे जागा विक्री करायची असल्याचे मुग्धा सामंत यांना सांगितले. त्यानुसार सामंत यांच्याशी जमिनीचा सौदा करून 56 हजार 770 रूपये सुमीत खेडेकर याने घेतले.
पैसे घेतल्यानंतर सुमीत याने मुग्धा सामंत यांच्याशी जमिनीचा व्यवहार केला नाही, तसेच ती जागा सामंत यांच्या नावे करून दिली नाही. सुमीत याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच मुग्धा सामंत यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सुमीत खेडेकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1