(संगमेश्वर)
तालुक्यातील बावनदीच्या खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ९:४५ वाजता घडली. प्रवीण महादेव कळंबटे (वय ४५, रा. परचुरी कळंबटेवाडी, संगमेश्वर) असे त्यांचे आहे. त्यांचा भाऊ नीलेश कळंबटे यांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार, प्रवीण कळंबटे हे बुधवारी शेतामध्ये काम करत असताना शौचालयासाठी नदीकडे गेले होते. त्यावेळी पाय घसरून पडून नदीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. संगमेश्वर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1