(नवी दिल्ली)
निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडशी (Electoral bonds) संबंधित माहिती सार्वजनिक केली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 12 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाला (ECI) निवडणूक रोख्यांशी संबंधित डेटा प्रदान केला होता. त्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर डेटा अपलोड करण्यात आला आहे. SBI कडून प्राप्त झालेला इलेक्टोरल बाँड डेटा जसा आहे तसा वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या निवडई/णूक रोख्यांमध्ये (Electoral bonds) राजकीय पक्षांना किती निधी मिळाला याबाबत सविस्तर माहिती आहे. यामध्ये भाजप पक्ष आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि इतर काही पक्षांनाही निधी मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजपला ६ हजार ६० कोटी ५१ लाख इतका निधी मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर काँग्रेसला १ हजार चारशे २१ कोटी ८६ लाख इतका निधी मिळाला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर इतरही काही पक्षांनी ही निवडणूक रोखे घेतल्याची माहिती आहे.
निवडणूक आयोगानं स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेली माहिती दोन भागात अपलोड केली आहे. आयोगाने ७६३ पानांच्या दोन याद्या अपलोड केल्या आहेत. यातील एका यादीत निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉंड खरेदी करणाऱ्यांचा तपशील आहे. तर दुसऱ्या यादीत राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांची माहिती आहे. यामध्ये ज्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले ते आणि ज्यांना निवडणूक रोख्यांची रक्कम मिळाली ते राजकीय पक्ष अशी नावं जाहीर केली आहेत. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांमध्ये फ्युचर गेम्स अँड हॉटेल सिस्टीम्स,क्विक स्पलाय चेन्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्रायझेस, टोरेंट पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांता लिमिटेट, अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाईज, पीवीआर, केवेंटर, सुला वाइन, वेल स्पन, सन फार्मा यांच्यासह इतर कंपन्यांचा समावेश आहे.
In compliance of Supreme Court's directions, the State Bank of India (SBI) had provided the data pertaining to the electoral bonds to the Election Commission of India (ECI) on March 12, 2024. The Election Commission of India has today uploaded the data on electoral bonds on its…
— ANI (@ANI) March 14, 2024
निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या तपशीलामध्ये १२ एप्रिल २०१९ नंतरच्या १ हजार रुपयांपासून १ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांच्या खरेदीची माहिती आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी मिळालेल्या पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, एआयडीएमके, बीआरएस, शिवसेना, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांचा समावेश असल्याचं या तपशीलातून दिसत आहे. सर्वाधिक निधी भाजपला मिळाल्याचे दिसत आहे.
सर्वधिक निधी मिळविणारे पक्ष
भाजप-
काँग्रेस-
एआयडीएमके-
बीआरएस-
शिवसेना-
टीडीपी-
वायआरएस काँग्रेस-
डीएमके-
जेडीएस-
राष्ट्रवादी काँग्रेस-
तृणमूल काँग्रेस-
जेडीयू-
आरजेडी-
आप-
समाजवादी पक्ष-
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1