(रत्नागिरी)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार, दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 11 वाजता अति महत्वाच्या बैठकीचे (मिटिंग ) आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक सावंत नगर, टी आर पी रत्नागिरी (आयु अरविंद सावंत यांचे निवास स्थान) याठिकाणी होणार असून सभेला तालुक्यातील पुरुष, महिला व युवा यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून मुंबई याठीकाणाहून वंचित बहुजन आघाडी हितचिंतक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
यासोबत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. रुपेंद्र जाधव व सहकारी जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सभासद, हितचिंतक, मतदार या सर्वांनाच उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रत्नागिरी तालुका कमिटीच्या वतीने मुकुंद सावंत (सचिव ) यांनी केले आहे.