( देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील देवघर गावातील ग्रामदेवता पडळकरीणदेवी जवळ दोन वर्षापूर्वी शिमगात्सवात कोरोना महामारीचे संकट नष्ट होवू दे व सर्वांना सुख समृद्धी लाभुदे यासाठी गावकर्यांनी गोंधळ घालू असा नवस केला होता. तो नवस यंदाच्या शिमगात्सवात दि. १८ रोजी रात्रौ देवीची पालखी प्रथेप्रमाणे मंदिरातून सहाणेवर आणणेत आली. त्यानंतर परंपरेनुसार यथासांग पुजाअर्चा करून झालेवर गोंधळ घालून नवस पुर्णत्वास नेणेत आला. नाणीजचे गोंधळी मंडळाने हा गोंधळ कार्यक्रम केला.
दोन वर्षापुर्वी कोरोना महामारीला सुरूवात झाली व सर्वत्र बंदी आल्याने सर्व सणांवर बंधने लादली गेल्याने सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या महामारीने अनेकांना मृत्युने गाठले. तर अनेकांची रोजारोटी गेली. यामुळे हवालदिल झालेले चाकरमानी व गावकरी यांना या सर्वांतून सर्वांना मुक्ती मिळून जनजीवन पुर्ववत होवून सुख समृद्धी लाभावी यासाठी गावकरेंनी ग्रामदेवतेला गोंधळ घालू असा नवस बोलून साकडे घातले होते. तो नवस यंदाच्या शिमगात्सवात गावच्या सहाणेवर गोंधळ घालत पुर्णत्वास नेणेत आला. गोंधळ कार्यक्रमात गावकर, मानकरी यांचेसह माहेरवाशिणी व गावातील सर्व आबालवृद्धानी सहभाग घेवून नवसाचा गोंधळ कार्यक्रम पार पडला.