(रत्नागिरी)
तालुक्यातील बेदरकारपणे एसटी चालवून अपघात करत एसटीमधील १३ प्रवाशांच्या लहान मोठ्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचाही ही घटना सोमवार ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. देवरुख ते संगमेश्वर जाणाऱ्या रस्त्यावरील लोवले पदळीचे वाकण येथे घडली आहे.
Also Read : देवरुख संगमेश्वर बस लोवले येथे दरीत कोसळली
अमित सुधाकर आपटे (४६, रा. मंगळवार पेठ, सध्या रा. देवरुख, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात बबन कृष्णा पवार (५९, रा. फणसवळे पवारवाडी संगमेश्वर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी अमित आपटे हा आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-१४-बीटी-२४३२) घेउन देवरुख ते संगमेश्वर असा प्रवासी घेउन जात होता. तो लोवले पदळीचे वाकण याठिकाणी आला असता त्याचा एसटीवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कठड्यावर चढून नाल्यात पडून हा अपघात झाला.
अपघातात एसटीमधील १३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून एसटीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी चालकाविरोधात भादंवि कायदा कलम २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow us: https://www.facebook.com/Ratnagiri24News
Visit us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1