(खेड)
तालुक्यातील एका व्यक्तीला व्हॉट्सॲप कॉल आला. या कॉल वरून मोर्फ केलेले फोटो फेबुकवर खात्यावरील व्हायरल करेन अशी धमकी देऊन संबधित व्यक्तीकडून तीस हजार उकळले होते. याबाबत खेड पोलीस ठाण्यात दिनांक ०५/११/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच सेक्सटॉर्शन गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
एका अनोळखी हिंदी भाषिक इसमाद्वारे खेड येथील रहीवासी असणाऱ्या एका इसमाच्या व्हॉट्सॲपवर व्हॉईस कॉल करण्यात आला. कॉलवरील संभाषण संपताच त्यांचे Morph केलेले फोटो पाठविण्यात आले. व सदर छायाचित्रे ही त्यांच्या Facebook अकाऊंट वरील सर्व मित्रांना पाठवणार असे ब्लॅकमेल करण्यात आले. व तसे न करण्यासाठी सदर इसमास प्रथम ₹ १५००० व नंतर पुनः ₹ १५,००० असे एकूण ₹३०,००० गूगल-पे च्या माध्यमातून पाठविण्यास सांगीतले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं. कलम ३८५ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६७ अन्वये दाखल करण्यात आला होता.
या गुंन्ह्याचा रत्नागिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी खेड राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन पांडुरंग भोयर यांच्या माध्यमातून पथकासह गुन्ह्याचा तपास सुरू होता.
या पथकामार्फत गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच फिर्यादी यांनी या हिन्दी भाषिक इसमाला केलेल्या ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा कसून तपास करण्यात आला असता तपासामध्ये आरोपी मेहजर अली इकबाल हुसैन (रा. फतेहपुर ता. पहाडी जिल्हा डिग, राज्य राजस्थान) या व्यक्तीचे नाव समोर आले. त्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याकरिता यापूर्वी राजस्थान येथे पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. संशयित आरोपी हा तेथून फरारी झाल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर खेड पोलीसांमार्फत आरोपीच्या ठाव ठिकाणाबाबत गोपनीय माहिती काढण्यात आली व आरोपी मेहजर अली इकबाल हुसैन (रा. फतेहपुर ता. पहाडी जिल्हा डिग, राज्य राजस्थान) याला सोमवारी दिनांक ०४/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 100% रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे.
संशयित आरोपी हा “सेक्सटॉर्शन”च्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी कडून वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन व 4 विविध मोबाईल कंपनीचे सिमकार्ड जप्त करण्यात आलेले आहेत.
ही कारवाई खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. नितीन भोयर, खेड पोलीस ठाणे,पो.कॉ श्री. वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे व पो.कॉ श्री. कृष्णा बांगर यांनी केली.