केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी काही शेतकऱ्यांसाठी तर काही तरुणांसाठी आहेत, यासोबतच अनेक योजना महिलांसाठीही आहेत. परंतु त्यांची व्यापक प्रसिद्धी न झाल्याने त्या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचू शकत नाहीत. अनेक महिलानां या योजना माहीतच नसतात, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. महिलांना स्वावलंबी बनवून महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा अनेक योजेनांमागे सरकारचा उद्देश आहे. तसेच महिलांना पुरुषांइतकाच मान सन्मान मिळावा म्हणून खास महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवण्यात आल्या आहेत.
महिला समृद्धी कर्ज योजना-
महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्ये उद्दिष्ट्य आहे.
- दिव्यांग महिलांना राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांमध्ये महिला समृद्धी योजनेंतर्गत व्याजदरामध्ये १% सुट दिली जाते.
- कर्ज मंजुरी प्रक्रियेत अशा महिलांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 टक्के आहे. तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षे आहे. या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे. महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4 टक्के आहे. तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी हा तीन वर्षे आहे.या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे.
- महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो.
- राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी रुपये 25,000 हजार आहे.
महिला समृद्धी कर्ज योजनेची पात्रता
1) सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे,
2) बचत गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकांतील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
3) लाभार्थी बीपीएल(दारिद्र्य रेषेखालील) श्रेणीतील असावेत.
4) कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
5) महिला लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षांतील असावे.
6) कर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रुपये 98 हजार तर, शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे 1 लाख 20000 रुपये पर्यंत असावे.
7) केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
8) बचतगट स्थापन होऊन किमान ०२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल महिला बचत गटास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
9) अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेच्या अटी
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना ९५% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व ५% कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य असतो परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेस स्वतःकडील ५% रक्कम भरावी लागेल.
- कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग ४ महिन्याच्या आत करणे अनिवार्य आहे.
- महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २० लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्यावरील रक्कम लाभार्थी महिलेस स्वतःकडील भरावी लागेल.
- या योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाईल.
- अर्जदार महिला कुठल्याही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेची थकबाकीदार असता कामा नये.
- अर्जदार महिलेने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या स्वरोजगार योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ३ वर्षाच्या आत परत करणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरून सदर योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलेवर दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
- महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्थसहाय्य किमान ५,३,२ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या महिला बचत गटास दिले जाईल
- अर्थसहाय्य गट स्थापन करुन किमान ४ वर्षे पूर्ण झालेल्या व नियमित मासिक बचत असणाऱ्या व सामुदायिक व्यवसाय अथवा गटातील किमान ५०% सदस्या व्यवसाय करत असणा-या महिला बचत गटास मिळू शकेल.
- महिला बचत गटांनी त्यांचे बचतीच्या संबंधात लेख्यांच्या नोंदी अद्यावत ठेवलेल्या असाव्यात.
- महिला बचत गटांची मासिक बैठक नियमीत व बचतीसाठी जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणी नियमीत भरणा केलेली असावी. याबाबत ठरावाच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- या निधीचा उपयोग महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या उद्योगाच्या/व्यवसाच्या सक्षमीकरणाकरीता करण्यात यावे.
- बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बैंक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक (गव्हर्नमेंट अंडरटेकींग) यामध्ये असेल त्या बचत गटांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- अशा प्रकारचे अर्थसहाय्य एकदाच गटाला मिळू शकेल.
- सदर योजनेचा(Mahila bachat gat loan) लाभ गटामार्फत सुरु असलेल्या व्यवसाय तसेच त्यांच्या बचतीच्या लेख्याची तपासणी केल्यानंतर पात्र ठरेलल्या महिला बचत गटास देण्यात येईल.
- दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा.आयुक्त यांना राहील.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- बँक खाते(अर्जदार महिलेला स्वतःच्या बँकेचा तपशील देणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील चालणार नाही.)
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सेल्फ ग्रुप मेंबर्शिप आयडी कार्ड
- रहिवासी पुरावा (विज बिल किंवा रेशन कार्ड)
- ओळख पुरावा (मतदार ओळखपत्र)
- अर्ज
- जन्म प्रमाण पत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक
- बचत गटाच्या पॅनकार्डची प्रत जोडणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटामधील सर्व महिलांची यादी सोबत जोडणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटांची मासिक बैठकीत जमा करण्यात येणाऱ्या बचतीची मासिक वर्गणीच्या नोंदीची छायाप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- बचत गटामार्फत करत असलेल्या व्यवसायाचा तसेच त्यापासून मिळत असलेल्या मासिक उत्पन्नाचा तपशिल सोबत जोडणे आवश्यक राहील.
- व्यवसायासाठी वापरात असलेल्या जागेबाबतचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.
- बचत गटाच्या बँक पासबुकची खाते सुरु केल्यापासून आजतागायत प्रती सोबत जोडणे आवश्यक राहील,
- अर्जासोबत तिन्ही पदाधिका-यांचे अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
- महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये किमान रु. १०,०००/- शिल्लक असणे आवश्यक आहे तसेच रक्कम कर्ज स्वरुपात दिली असल्यास किंवा ठेवीच्या स्वरुपात गुंतवणूक केली असल्यास त्याबाबतचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिका-याने प्रमाणित केलेली असावीत.
अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील.
- अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे.
- अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.
Also Read : SBI बॅंकेतून 3 कोटी सोन्यांची चोरी, सर्व्हिस मॅनेजरला अटक
Join us: https://www.facebook.com/Ratnagiri24News
Visit us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1