(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर गावचे रहिवासी, दैनिक तरुण भारतचे पत्रकार मिथुन लिंगायत यांचे वडील विश्वास रामचंद्र लिंगायत यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
नाना या टोपण नावाने ते सर्वांच्या परिचयाचे होते. मठ धामापूर येथील रास्त धान्य दुकानाचे ते कर्मचारी होते. शांत, प्रेमळ, मनमिळाऊ, थट्टामस्करी करणे असा त्यांचा स्वभाव होता. नानांची प्रकृती शनिवारी अचानक खालावली. उपचारासाठी तत्काळ त्यांना देवरुख येथे आणण्यात आले. यानंतर रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी पहाटे २.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचे पार्थिव मठधामापूर येथे निवासस्थानी आणण्यात आले. रविवारी दुपारी १२ वाजता शोकाकुल वातावरणात नानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, २ भाऊ, १ बहीण, सून, नातवंडे असा परिवार आहे