( राजापूर )
🟧 राजापूर शहरातील तरूण सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण याचा झालेला खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी संशयीत खूनी आरोपीच्या विरोधात दाखल गुन्हयात आता चोरीच्या ३९७ कलमाची वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे. सोमवारी परबकर यांनी पत्रकारांना दिली.
🟧 या प्रकरणातील संशयीत आरोपी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी (२५ रा.उत्तरपदेश, सध्या राजापूर) याची पोलीस कोठडी १५ मार्च पर्यंत असून या प्रकरणी कसून तपास सुरू असल्याचे परबकर यांनी सांगितले.
🟧 शहरातील रानतळे येथील सडयावर ९ मार्च रोजी राजापूरातील तरूण सलुन व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण (४० , रा.चव्हाणवाडी राजापूर) याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात दगड घालुन त्याचा खून झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी तातडीने तपास करत राजापूर पोलीसांनी या प्रकरणी शहरातील एका सलुन मध्येच काम करणाऱ्या रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला अटक केली हाती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती त्यावेळी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली होती. या प्रकरणी प्रारंभी या संशयीत आरोपीच्या विरोधात पोलीसांनी खूनाचा भा.द.वि. कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्या प्रकरणी २०१ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
🟧 यानंतर आता पोलीस तपासात सदरचा खून हा चोरीच्या हेतुने झाल्याचे पुढे आले असून आरोपीकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीवर आणखी एक कलम लावण्यात आले असून त्याच्या विरोधात आता ३९७ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे परबकर यांनी सांगितले.
🟧 या प्रकरणातील हा संशयी आरोपी १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत असून अजूनही पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, जबाब नोंदविण्यात आले असल्याचे परबकर यांनी सांगितले.