(चिपळूण)
चिपळूण येथील राजकीय राडा प्रकरणातील ११ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार नीलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमधील राड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ जाधव समर्थकांना खेड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अजूनही अनेकांचा शोध घेत आहेत.
चिपळूण येथे झालेल्या या राड्याप्रकरणी ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर विनापरवाना जमाव जमवून अचानक मोठमोठ्याने शिवीगाळ, घोषणाबाजी व दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आक्षेप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी शासनातर्फे भारतीय दंड विधान संहिता कलम १४३, १४५, १४७, १४९, ३५३, १६०, ४२७, ३३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये अटक केलेले शहानवाज आयुब शिरळकर, फैयाज सत्तार शिरळकर, हेमंत वासुदेव मोरे, संजय किसन भुवड, राम नारायण डिगे, सुनील शंकर तांबडे, संजय चंद्रकांत गोताड, राजेंद्र कृष्णा गायकवाड, दिलीप गणपत साबळे, प्रकाश भिवा जाधव, प्रभाकर पांडुरंग जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन अर्जावर २२ फेब्रुवारी रोजी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होऊन सर्वांना सोमवारी सायंकाळी न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांच्यावतीने अँड नितीन केळकर, अँड ऋषिकेश थरवळ, अँड सोहम भोजने यांनी काम पाहिले.
माजी खासदार नीलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमधील राड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ जाधव समर्थकांना खेड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अजूनही अनेकांचा शोध घेत आहेत.