(पुणे)
पिंपरी-चिंचवड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पवन पांडे असे आरोपीच नाव असून त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हा वकड येथील एका रसवंतीगृहात कामाला आहे. त्याची आठ वर्षीय अल्पवयीन मुळाशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या रसवंती समोर काही लहान मुले खेळत असायची. यात खून झालेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलगाही यायचा. आरोपी पांडेने त्याच्याशी ओळख केली. यानंतर त्याच्याशी जवळीक साधली. पांडे मुलांना रसवंतीगृहात बोलावत त्यांना रस प्यायला द्यायचा. यामुळे खून झालेय मुलाची आणि आरोपीची जवळीक वाढली. याचा फायदा घेऊन पांडे याने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. त्याला त्याला पाषाण येथे फिरायला नेले. या ठिकाणी त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान, आपले बिंग फुटू नये यासाठी त्याने मुलाची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह पाषाण तलावात फेकून दिला.
दरम्यान, मुलगा घरी आला नसल्याने त्याच्या आई वडिलांनी परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, तो सकाळ झाली तरी सापडला नाही. यामुळे त्याने पहाटेच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यात जात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी तपसाची चक्रे फिरवली. याच वेळी रसवंती गृह चालकाने आरोपीला फोन करून मुलाबद्दल विचारले. मात्र, त्याने माहिती नसल्याचे उत्तर दिले. मात्र, रविवारी अल्पवयीन आठ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले. वाकड पोलिसांनी वेगाने तपास केला. त्यांनी सिसिटीव्ही देखील तपासले. यात आरोपी पांडे मुलाला खुणावत असल्याचं अन् मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचे दिसले. दरम्यान, काही अंतरावर गेल्यावर दोघेही गायब झाल्याचे देखील सीसीटीव्हीत दिसले.
पोलिसांनी आरोपी पांडेला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने उदवाउडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांच्या संशय बळावल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. यावेळी त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी पांडे म्हणाला, माझ्याकडून अपघात झाला अन त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार, म्हणून मी मृतदेह पाषाणमध्ये फेकल्याचे स्पष्टीकरण त्याने दिलं. मग पोलिसांनी त्याने विश्वासात घेतलं अन घटनास्थळ गाठले. मात्र, पांडेने अपघाताचा बनाव रचल्याचं स्पष्ट झाले. त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचं उघड झाले.
पालकांनो आपल्या अल्पवयीन मुलांना एकट खेळण्यासाठी घराबाहेर पडू देऊ नका. घराच्या जवळ आणि तुमच्या नजरेसमोर ठेवा. जेणेकरूनअनोळखी आणि अमिष दाखवून मुलांना कोणी घेऊन जाणार नाही. मुलांना अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट किंवा इतर खायचा गोष्टी घ्यायच्या नाहीत, हे शिकवण गरजेचं आहे. यातूनच अशा गंभीर घटना टाळू शकतो अस आवाहन पोलिसांनी केल आहे.