(फुणगुस / एजाज पटेल)
पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या आरोपीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसार उपयोगी महागाचे साहित्य विविध साहित्य पासून अगदीच दहा वीस रुपयांना मिळणारी वस्तू खाद्यपदार्थ विकत घ्यायचे असले तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे. QR (क्विक रिस्पॉन्स) कोडसारखे स्कॅन आणि पेमेंट ऑप्शन आपण बऱ्याच दिवसांपासून वापरत आहोत. पण कोरोना महामारीनंतर त्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यांना माहित नाही अशांसाठी, QR कोड हा चौकोनी बारकोड असतो, जो आपण ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करण्यासाठी स्मार्टफोनच्या कॅमेराने स्कॅन करतो. QR कोड अनेक कामांसाठी उपयोगी ठरतो, हा वापरुव तुम्हाला वेबसाइट क्विक एक्सेस करता येते, अॅप डाउनलोड करणे, रेस्टॉरंट मेनू पाहणे आणि बरेच काही याच्या मदतीने करता येते.
कृषीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण जेमतेम दहा ते वीस टक्के असून मात्र आता खिशात नव्हे तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा अशी अवस्था निर्माण झाली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रधानमंत्री मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार ठराविक मुदत देऊन नागरिकांकडे असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकांमध्ये जमा करून घेण्यात आल्या आणि नंतर त्या चलनातुन कायम बाद करण्यात आल्या. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने ऑनलाइन व्यवहारात चालना मिळायला लागली. 2018 पासून रोकड विरहित व्यवहाराने गती घेत 2020 आणि 2021 या दोन वर्षातील लॉकडाऊन काळात आणखी जास्त व्यवहार ऑनलाइन झाला. ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्यांचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी. रिझर्व बँक ऑफ इंडिया यासंबंधी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करते त्याचे पालन केल्यास निश्चितच फसवणूक टाळणे शक्य आहे.
तिकिटे, फोन नंबर, ईमेल एड्रेस आणि पैसे ट्रांसफरसह माहिती आणि डेटा शेअर करण्यासाठी देखील क्यूआर कोड(QR Code) चा वापर वाढल्याने, सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणारे आता लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. अलीकडेच, लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार QR कोडचा वापर कसा करतात याबद्दल लोकांना चेतावणी समोर आली आहे.
कोणतीही वेबसाइटवर उघडणाऱ्या QR कोडद्वारे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देऊ नका. तुम्हाला QR कोडद्वारे पेमेंट करायचे असल्यास, ते वैध पेमेंट अॅपद्वारे केले जाणे आवश्यक आहे, जेथे तुम्ही प्राप्तकर्त्याच्या ओळख कंफर्म करू शकता. तुम्हाला कोणत्याही वेबसाइटद्वारे पेमेंट करायचे असल्यास तुम्ही स्वतः URL टाइप करा. नेहमी हे लक्षात ठेवा की QR कोड हा एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी स्कॅन केला जातो, पैसे मिळवण्यासाठी नाही. पैसे किंवा पेमेंट करण्याचा दावा करणारा ईमेल किंवा मॅसेजद्वारे पाठवलेला कोणताही QR कोड तुम्ही कधीही स्कॅन करू नये.