रस्ते अपघात हे कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी इतरांच्या चुकीमुळे घडतात. त्यामुळे रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. पण कधी कधी नैसर्गिक संकट येतात, तेव्हा मग अशा अपघातांपासून वाचणं कठीण होतं. शिवाय या अपघातांना कधी कधी भयंकर रुप मिळतं. असंच काहीसं राजस्थानमध्ये घडलं.
येथे एका वाहन चालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्यामुळे त्याच्या हातून गाडीचा कंट्रोल सुटला ज्यामुळे त्याने 8 जणांना चिरडलं. ही घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, ज्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपलब्ध माहितीनुसार, हे वाहन आणि वाहन चालक दोघेही यात्रेचा भाग होते. अशावेळी यात्रापुढे जात होती आणि हे वाहन मागून संथ गतीने जात होते. अचानक गाडीचा ॲक्सिलेटर जोरात दाबल्याचा भास झाला. यानंतर वाहन पुढे चालणाऱ्या लोकांना चिरडत पुढे जाऊ लागले. बाजारात शोभायात्रा निघाली तेव्हा लहान मुलं आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. सर्वच जण आनंदाने सहभागी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर रुग्णालयात आता मोठी गर्दी झाली आहे. बोलेरो चालकाला हार्ट अटॅक आला, त्यानंतर त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बोलेरो लोकांना चिरडत पुढे निघून गेली.
कोणाला काही समजण्यापूर्वीच या वाहनाने 8 जणांना धडक दिली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
Post Views: 3,376