जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी घरावर सीबीआयने छापेमारी केली आहे. याशिवाय मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आले आहेत.
सीबीआयने आज (22 फेब्रुवारी) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर छापा टाकला आहे. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना दावा केला होता की, एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. छापेमारीनंतर मलिक यांनी एक्सवर पोस्ट करत मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, छाप्याला घाबरणार नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असलेल्या मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. किरू जलविद्युत परियोजना (६२४ मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येकी १५६ मेगावॅट क्षमतेच्या ४ युनिट्ससह १३५ मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.
सत्यपाल मलिक यांनी 17 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना कोट्यवधींची लाच देऊ करण्यात आली होती. त्यादरम्यान दोन फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यात घोटाळा झाल्याचे त्यांच्या सचिवांनी सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही सौदे रद्द केल्याचे मलिक यांनी सांगितले होते.
दोन्ही फायलींसाठी आपल्याला 150-150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ‘मी म्हणालो होतो की मी पाच कुर्ता-पायजमा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघेन. सीबीआयने विचारल्यावर मी ही ऑफर देणाऱ्यांची नावे सांगेन,असेही मलिक म्हणाले होते
CBI conducts raids at more than 30 places, including the premises of former Jammu and Kashmir Governor Satyapal Malik, as part of its investigation into alleged corruption linked to the awarding of a Kiru Hydroelectric project contract in the UT: Sources
— ANI (@ANI) February 22, 2024