(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचा शासकीय रेखाकला२०२३/२४ परीक्षेचा इंटरमीजीएट व एलिमेंटेरी चा निकाल १००% लागला आहे. विद्यालयातून इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण७२विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, यामध्ये कु अनिमेश रमेश हरचकर या विद्यार्थ्याला A श्रेणी प्राप्त झाली आहे, तर B श्रेणीत ऋतू प्रशांत कुळकर्णी, तेजस्वी किशोर पात्ये, सानवी दिलीप ठावरे, ईशान लतेश जोशी, सानवी कौस्तुभ केळकर, अपूर्वा किरण सावंत, अथर्व चंद्रशेखर सावंत, यश दीपक धनावडे, आर्या अमोल सुर्वे, हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एलिमेंटेरी ग्रेड परीक्षेसाठी३९विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, यामध्ये B श्रेणीत तृषा लक्ष्मण वसावे, दिव्या विनायक भोसले, ओजस प्रदीप मयेकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी विद्यालयाचे कला शिक्षक श्री शाम पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या परीक्षेसाठी विशेष मेहनत घेतली.
विद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बिपीन परकर, पर्यवेक्षक श्री उमेश केळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कला शिक्षक श्री शाम पवार यांचे अभिनंदन केले. प्रशालेच्या या यशाबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष श्री विवेक परकर, सचिव श्री विनायक राऊत, खजिनदार श्री संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे .