(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाची महत्वपूर्ण गरज ओळखून सन १९८९-९० सालच्या इ.१० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून पाण्याच्या साठवण टाकीसह शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा देणगी रूपाने दिली.
सुमारे एक लाख किमतीची एक्वा ड्रिंकिंग वॉटरची उत्तम सुविधा साठवण टाकीसह विद्यालयाला देणगी रूपाने पुरवल्याने विद्यालय व शिक्षण संस्थेच्या वतीने इ.१० वी सन १९८९-९० च्या माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे व शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी अभिनंदन करून या सेवाभावी माजी विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद दिले.
तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या १० वी च्या सन १९८९-९० च्या माजी विद्यार्थ्यांनी एक अविस्मरणीय स्नेह मेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून आपण ज्या शाळेतून शिक्षण घेऊन मोठे झालो, ज्या शाळेमधून शिक्षण घेऊन स्वावलंबी झालो, त्या शाळेविषयी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने एकत्र आले. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची महत्वपूर्ण आणि आरोग्यदायी गरज ओळखून पाण्याच्या साठवण टाकीसह शुद्ध जल पाणीपुरवठा (वॉटर ड्रिंकिंग वॉटरची) सुविधा पुरवल्याने शाळा व मालगुंड शिक्षण संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे लाभार्थी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
या शुद्ध पाण्याचा विद्यालय व कनिष्ठ विद्यालयातील सुमारे एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही योजना खूपच उपयुक्त ठरली आहे.या. बॅचच्या हरहुन्नरी आणि जिद्दी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात स्नेह मेळावा घेऊन आपल्या बालपणातील व विद्यार्थी जीवनातील आठवणींना उत्स्फूर्तपणे उजाला दिला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी शाहिरी, पोवाडे, गीते, देशभक्तीपर गीते,आवडची गाणी गाऊन गंमती-जमती सादर केल्या, तर काहींनी आपल्या बालपणातील शालेय जीवनातील विद्यार्थी व शिक्षकांच्या हद्यस्पर्शी आठवणी सांगून मनमोकळेपणाने मनमुराद संवाद साधला. अनेकांच्या भावना प्रकटीकरणातून हा मेळावा अधिक रंजक आणि स्नेहपूर्ण ठरला.
सुरवातीला माजी विद्यार्थ्यांमधून देणगी देण्यासाठी व स्नेह मेळाव्याचे नेतृत्व करणारे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले. राजेश सावंत, दिलीप पांचकुडे, संतोष शिंदे नंदकुमार धामणे, दत्ताराम पानगले , प्रदिप गोवळकर, सुजाता सुर्यगंध शिल्पा कदम. पद्मजा पवार, उज्ज्वला कळंबटे संगिता गोताड विजया महाकाळ, सुभाष मांयगडे , अंकुश जाधव यांनी शाळेविषयी व आपल्या विद्यार्थी जीवनातील मनोभावे प्रसंग कथन केले. या बॅचचा प्रातिनिधिक स्वरूपात माजी विद्यार्थ्यांचा शाळा व शिक्षण संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बंधू मयेकर यांनी सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले. सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी तर आभार सहाय्यक शिक्षक अरुण कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत शिक्षक व दिवंगत माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.शालेय देणगीसाठी व स्नेह मेळावा संपन्न करण्यासाठी सलीम नाकाडे,संतोष शितप,प्रविण कुळ्ये, वासुदेव गोणबरे, चंद्रकांत गोणबरे, संतोष नाईक, रमेश मुंडेकर, उमेश खोले, शशिकांत सांबरे, प्रदीप गोताड, तुकाराम गोताड, मिना देसाई, रेखा देसाई, जयवंती यादव, निता जाधव, शालिनी देसाई, सुरेश पडयाळ, मधुकर कुवार, आशा-लता यादव,सरिता यादव, कुसुम महाकाळ नरसिंग देसाई, प्रकाश खोल्ये, प्रमोद देसाई, प्रसन्न कुबल,प्रशांत सावंत, दत्ताञय रहाटे, सुभाष मुंडेकर, महादेव मोहिते, जानू भोजे यांनी यशस्वी मेहनत घेतली.
फोटो-जाकादेवी विद्यालय येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा शुभारंभ करताना विद्यार्थी, मुख्याध्यापक व माजी विद्यार्थी
(छाया : संतोष पवार, जाकादेवी)