(मुंबई)
मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की, मुंबईच्या डोंगरी भागात काही दहशतवादी घुसले आहेत. हा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी अधिक चौकसी केली असता फोनद्वारे देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला, ज्यात मुंबईच्या डोंगरी भागात दहशतवादी घुसल्याची माहिती दिली आणि त्यांना पोलिसांच्या मदतीची गरज आहे. या फोननंतर मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात खळबळ माजली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता हा फोन बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.
Maharashtra | Mumbai Police Control received a threatening call. The caller told the control room that some terrorists armed with weapons had entered the Dongri area of Mumbai, and they needed police assistance. As soon as the police started an investigation after receiving this…
— ANI (@ANI) February 16, 2024