(संगमेश्वर)
तालुक्यातील कुचांबे येथील शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला बँको सहकार परिषदेचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. दमण येथील सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुचांबेसारख्या ग्रामीण भागात थेराडे कुटुंबीयांच्या पुढाकारातून शिववैभव पतसंस्थेचे रोपटे लावण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेचे काम सुरू आहे. माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पतसंस्थेचे सरचिटणीस संतोष थेराडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेचे जनरल मॅनेजर रवींद्र थेराडे, किशोर भागडे, मयूर थेराडे, शुभम दाभोळकर उपस्थित होते. या 1. या पुरस्काराने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संस्थेचे सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असल्याचे अध्यक्ष प्रकाश थेराडे यांनी सांगितले.