(रत्नागिरी)
रत्नागिरीत 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर साहिल मोरे या तरुणाने आत्महत्या केली होत़ी. हे प्रकरण रत्नागिरीत चांगलच गाजले होते. त्यानंतर मिताली भाटकर हिच्याविरूद्ध साहिल मोरे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खटला चालविण्यात येत आह़े. नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी मिताली हिला 5 फेबुवारी रोजी सत्र न्यायालयापुढे हजर राहण्यास सांगितले होत़े. त्यानुसार मिताली ही न्यायालयापुढे हजर झाली होती. रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस़ एस़ गोसावी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालविण्यात येत आह़े. या खटल्याची पुढील सुनावणी आता 26 फेबुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आह़े.
खटल्यातील माहितीनुसार साहिल विनायक मोरे (22, ऱा अलावा रत्नागिरी) या तरूणाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केली होती. घटनेच्या दिवशी सकाळी साहिल याच्यासोबत मिताली ही देखील फ्लॅटवर होत़ी. साहिल याने मिताली हिला वारंवार लग्नाविषयी विचारले होत़े. मात्र मिताली हिने लग्नास नकार दर्शविला होत़ा, असे सांगण्यात आले. यातून दोघांमध्ये वाद देखील झाला झाल़ा.
मिताली आपल्याला लग्नासाठी नकार देत असल्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भितीने साहील मोरेने गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या भावाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे साहिल मोरेच्या बहिणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयित मिताली अरविंद भाटकर (रा. तोणदे, रत्नागिरी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिताली ही लग्नाला नकार देत असल्याच्या कारणातून साहिल याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. मिताली हिने लग्नाला नकार दिल्याने बदनामीच्या भितीने साहिल याने आत्महत्या केल़ी अशी तक्रार साहिल याच्या नातेवाईकांकडून पोलिसात देण्यात आली होत़ी. त्यानुसार शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मिताली हिच्याविरूद्ध भादंवि कलम 306 नुसार गुन्हा दाखल केल़ा. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून मिताली हिच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केल़े होते. आता तिच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला चालू आहे. पुढील सुनावणी 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
साहिल एमआयडीसी येथील एका कार शोरुममध्ये कामाला होता. तर तो अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षणही घेत होता. तर साहिलची आई जेटीवर मच्छि विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारी सकाळी त्याने आईला जेटीवर सोडल्यानंतर तो आपल्या प्रेयसिला भेटण्यासाठी साईभूमी नगर येथील प्रेयसीच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी झालेल्या वादातून साहिल याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.