(रत्नागिरी)
न्यायालयाच्या आवारात उभी करून ठेवलेली महिला वकिलाची दुचाकी चोरीला गेली. ही घटना रत्नागिरीतील जिल्हा सत्र न्यायालयात ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात ९ फेब्रुवारी रोजी नोंद करण्यात आली आहे. या गाडीची किंमत १५ हजार इतकी आहे.
या चोरीप्रकरणी कार्तिकी किरण शिंदे (रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली. त्या ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दुचाकी (एमएच ०८, एए ८७००) जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या पार्किंग समोरील मोकळ्या जागेत उभी करुन ठेवली होती. त्यानंतर त्या आपल्या कामासाठी न्यायालयात गेल्या होत्या.
त्या सायंकाळी ६:३० च्या सुमारास दैनंदिन काम आटपून न्यायालयाबाहेर आल्या, यावेळी त्यांना जागेवर गाडी दिसली नाही. त्यांनी जवळपास चौकशी केली, गाडीचा शोध घेतला, मात्र त्यानंतरही गाडी सापडली नाही