(चिपळूण)
शासकीय योजना तर अनेक आहेत, परंतू तिथ पर्यंत घेऊन जाणारे आरोग्यदूत शशिकांत चव्हाण यांच्या सारखे फार दुर्मिळ आहेत. नुकतेच अरुण पवार यांना शंभर टक्के अंध असल्याचे शासकीय प्रमाणपत्र डॉक्टर श्री राहुल जी साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले.
तब्बल दोन नव्हे तीन नव्हे तर मागील तब्बल 40वर्षापासून दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे अंध असणाऱ्या चिपळूण तालुक्यातील रेहळ भागाडी येथील अरुण पवार यांची याबाबत परिस्थिती गावातील उपसरपंच श्री रुपेश शेलार यांनी श्री शशिकांत चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली होती श्री शशिकांत चव्हाण यांनी स्वतःचा वेळ खर्च करून त्यांना रत्नागिरी येथे नेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संघमित्रा फुले मॅडम यांची भेट घेतली. सरकारी रुग्णालयात श्री अरुण पवार यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना शंभर टक्के अंध असल्याची सर्टीफिकेट दिले. यामुळे उशिरा का होईना 40 वर्षानंतर मिळालेल्या दाखल्यामुळे त्यांना आता शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे व त्यामुळे त्यांना अनेक अडचणींवर मातही करण्यास मदत होणार आहे.
श्री शशिकांत चव्हाण हे अनेक दिन दुबळ्या, गरीब व आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या, अनेक प्रकारच्या आजाराने त्रस्त असलेल्या अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम करीत असल्याने त्यांचे या कामिगीरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.