(रत्नागिरी)
तालुक्यातील पावस ते पूर्णगड जाणाऱ्या रस्त्यावर मेर्वी फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी बसलेल्या प्रौढाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५५ वा. करण्यात आली.
वरेश अशोक पाटील (४०, रा. गावखडी भंडारवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश अरविंद कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा मेर्वी फाट्याजवळ एका टपरीच्या मागे दारू पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे