अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्मने स्मार्टफोनमधील ६ अॅप्स डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याचा धोका आहे. हे धोकादायक अॅप्स गेल्या दोन वर्षांपासून प्लेस्टोअर उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते अॅप्सचा वापर करत असल्याची माहिती समोर आली.
ईएसईटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गूगल प्ले स्टोअरमध्ये ६ धोकादायक अॅप्स आहेत. या अॅप्समुळे वापरकर्त्यांची खाजगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. गूगल प्ले स्टोअरमध्ये असलेल्या या धोकादायक अॅप्समध्ये प्राइव्ही टॉक (Privee Talk), लेट्स चॅट (Let’s Chat), क्विक चॅट (Quick Chat), चिट चॅट (Chit Chat), रफाकत (Rafaqat) आणि मीटमी (MeetMe) यांचा समावेश आहे. फोनमध्ये वरील कोणतेही ॲप असल्यास ते त्वरित डिलीट करावे. हे अॅप तुमच्या फोनमधील कोणतीही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतो. याशिवाय, हे तुमच्या नकळत कॉल रेकॉर्ड करू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. याशिवाय, फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाइल किंवा फोल्डर दिसले तर ते डिलीट करा.
अशा प्रकरे सायबर गुन्हेगारी टाळावी
– अर्जंट किंवा तत्काळ अशा स्वरूपात मेसेज किंवा लिंक आल्यास त्याची खात्री करावी.
– कोणाच्या सांगण्यावरून मोबाईलद्वारे केवायसी करू नये.
– कोणत्याही व्यक्तीला ओटीपी सांगू नये, तसेच बँक आणि एटीएमचा पिन वारंवार बदलत राहावे.
– सवलत, कमी दिवसांत जास्त पैसे मिळतील, ॲवॉर्ड मिळालाय, नोकरी मिळेल अशा गोष्टींना बळी पडू नका.
– जुन्या गाड्या किंवा वस्तू स्वस्तात भेटतील, यावर विश्वास ठेवू नका.
फसवणूक झाल्यास येथे तक्रार करा
ऑनलाइन फसवणूक झाल्यावर cybercrime.gove.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी, ज्यामुळे तुमचे बँक खाते गोठवता येईल. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यातही याबाबत माहिती द्यावी, जेणेकरून संबंधितावर कारवाई करणे सोयीचे होईल.