जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगत आहेत, माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, वेडूर्य, वज्रनिल, गोमेद, परीस हे दगड आहे. यापेक्षा वेगळे म्हणजे सूर्यकांत आणि सोमकांत अशा प्रकारचे औषधीमणी आहेत. यापेक्षा वेगळे पाषाण आहेत ते म्हणजे विविध तीर्थामध्ये तुम्हाला दिसतात ते, त्याच्यापासून विहिरी, तलाव, हरिहराच्या मूर्ती तयार होतात. असा विचार केला तर पाषाण हा खूप महत्त्वाचा आहे. मनुष्य देखील या पाषाणापुढे गरीब आहे. मात्र तो पाषाण आहे तो अपवित्र विनाकारण जगणारा नसतो. त्याच्यासारखा दुश्चित अभक्ताचा देह असतो. अशा प्रकारे दुश्चित किंवा कुठेच लक्ष नसलेले जे लोक असतात त्याच्यामुळे घात होतो. त्यांच्यामुळे प्रपंच आणि परमार्थ काहीच साध्य होत नाही.
दुश्चितपणामुळे कार्याचा नाश होतो, चिंता निर्माण होते, स्मरण नाहीसे होते. दुश्चितपणामुळे शत्रू आपल्याला हरवतो, आपल्याला जन्म मरण बघावे लागतात, गुणांची हानी होते, भजन घडत नाही, साधना घडत नाही. साधकांशी ज्ञानगोष्टी होत नाहीत. निश्चय केला जात नाही. जय मिळत नाही, स्वहिताचा क्षय होतो. त्याच्यामुळे श्रवण घडत नाही, विवरण होत नाही, निरूपण हातून जातं. चंचल वृत्तीमुळे तो मनुष्य एका ठिकाणी बसलेला दिसतो पण तो मनाने तिथे नसतो. त्याचे वेगळेच विचार चालू असतात. त्याच्या मनामध्ये पिशांच्यासारखे वेडे विचार निरंतर धावत असतात.
अंध मुके आणि बधिर असतात तसा चंचल मनोवृत्तीच्या माणसाचा संसार असतो. सावध असला तरी त्याला उमजत नाही. श्रवण करत असूनही तो ऐकत नाही. ज्ञान असून सुद्धा त्याला सारासार विचार नसतो. अशा प्रकारे चंचल वृत्तीचा मनुष्य आळशी असतो. त्यामुळे त्याला परलोक मिळत नाही. त्याच्या जीवामध्ये नेहमी रात्रंदिवस आळस वास करतो. दुश्चितपणा नसेल तरी त्याच्यात आळस येतो. आळशी माणसाला काही मोकळेपणास मिळत नाही. आळसामुळे तो विचार करीत नाही, माणूस आळसामुळे कृती करीत नाही. आळसामुळे पाठांतर करत नाही. आळसामुळे श्रवण करीत नाही. आळसामुळे निरूपण करीत नाही. आळसामुळे परमार्थाची खूण असते ती मलीन होते. आळसामुळे नित्य नियम पाळले जात नाहीत. आळसामुळे अभ्यास बुडतो. आळमुळे असंभाव्य असा आळस वाढतो. आळसामुळे निश्चय आणि धैर्य होत नाही. वृत्ती मलीन होते. विवेकाची गती मंद होते. आळसामुळे झोप वाढते. आळसामुळे वासना वाढतात. आसामने सद्बुद्धी शून्यकार होते. चंचल मनोवृत्तीमुळे आळस, आळसामुळे निद्रा विलास, निद्राविलासामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा आणि आळस, चंचल वृत्ती हे मूर्खाचं लक्षण आहे. त्यांना काही निरूपण समजतच नाही. ही तिन्ही लक्षणे जिथे असतील तिथे विवेक आढळणार नाही.
अज्ञानाला सुख नाही. भूक लागली म्हणून जेवण केले, जेउन उठला आणि त्याला आळस आला. आळस आल्यावर तो झोपला. पुन्हा झोपल्यानंतर पुन्हा उठला पुन्हा चित्त चंचल झाले. त्याला सावधानता नाही. मग तो निरूपण ऐकेल कशासाठी? त्याला आत्महीत कसे साधता येईल? माकडाला रत्न दिलं किंवा पिशाच्चाहाती धनाचा साठा दिला त्याप्रमाणे चंचल माणसापुढचे निरूपण ते व्यर्थ जाते. असो. आता किती दिवसांमध्ये मुक्ती होते असा प्रश्न आहे त्याचे उत्तर देतो. सज्जनाच्या संगतीने किती दिवसात मुक्ती मिळते? याचे उत्तर निरुत्तर करणारे आहे. का संतसंगाचा विचार असा आहे, लोखंड परिसाला लागल्यानंतर सोने लगेच होते. गंगेचा थेंब जरी समुद्राला मिळाला तरी ताबडतोब संगम होतो. त्याप्रमाणे सावधपणा, निग्रहीपणा, आणि दक्षता हे असेल तर त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. इतरांना मात्र काहीच मिळू शकत नाही! असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127