लांजा : न्यु इंग्लिश स्कुल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी गुरव व साक्षी बेर्डे या दोन मुलींनी क्रिकेट मध्ये देशस्तरीय व राज्यस्तरीय कामगिरी बजावली . भारतीय टेनिस क्रिकेट संघातून नेपाळ येथे पार पडलेल्या साऊथ एशियन चॅम्पियन कप स्पर्धेत गोलंदाजी व फलंदाजी करत उल्लेखनीय कामगिरी करत कुमारी वैष्णवी विलास गुरव हिने उपविजेते पद पटकावले. तर राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये साक्षी बेर्डे हिने यश संपादन केले.
🟧 वैष्णवी व साक्षी या दोघींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रसिध्द जेष्ठ डॉ. अनिल पत्की, संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये व मान्यवरांच्या हस्ते लांजा येथे सत्कार करण्यात आला.
🟧 न्यू इंग्लिश स्कुल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात पट संख्या असलेली शाळा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण देत मुला मुलीना घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.
🟧 वैष्णवी गुरवची साउथ एशियन टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली होती. ही स्पर्धा २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नेपाळ राज्यातील पोखरा या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाने विजय संपादन केला होता. यामध्ये लांजा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी गुरव हीने देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.
🟧 तीच्या कामगिरीची दखल घेत न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय लांजातर्फे शुक्रवारी ११ मार्च रोजी सत्कार करण्यात आला. लांजा हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लांजा येथील डॉक्टर अनिल पत्की हे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते वैष्णवीला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
🟧 यावेळी प्रतिक्रिया देताना वैष्णवी गुरव म्हणाली, क्रिकेट मध्ये देशपातळीवर नाविन्यपूर्ण यशस्वी कामगिरीमूळे मिळालेल्या यशाचे खरी मानकरी आहेत ते क्रीडा शिक्षक व मला आर्थिक पाठबळ देणारे डॉ.अनिल पत्की व शिक्षण संस्था आहे त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते.
🟧 तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, हायस्कूलचे मुख्याध्यापक रमाकांत सावंत, सचिव विजय खवळे,संस्था संचालक महंमद रखांगी, राजू शेट्येे, सौ. पाटकर ,उप मुख्याध्यापक श्री.फाटक, पर्यवेक्षिका श्रीम.आठवले, लांजा हायस्कूलचे शिक्षक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.