(रत्नागिरी)
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चांगलीच कामाला लागलेली आहे. काही तालुक्यांमधून जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधील काही कार्यकर्त्यांनी विधानसभा क्षेत्र प्रमुख लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये योगेंद्र द्वारकानाथ चव्हाण, सदानंद हरिश्चंद्र पाटील, इम्रान यासीन वस्ता आदी राजीवडा परिसरातीलल कार्यकर्ते यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष युसुफ बुड्ये, स्वप्निल राजेंद्र चव्हाण, चेतन नंदकुमार सरवणेकर आदिंनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश करण्यात जिल्हा चिटणीस परशुराम उर्फ दादा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, अमित विलणकर, यांचा मोलाचा वाटा आहे.