(मुंबई / निलेश कोकमकर)
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथील सामजिक कार्य करणारी संस्था म्हणजेच नवलाई सेवाभावी संस्था. ह्या संस्थेने आई जीवदानी कला फाऊंडेशन मुंबई (रजि) प्रस्तुत कोकणची प्रख्यात लोककला म्हणजे नमन अर्थात खेळे शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ८.०० वाजता नमन कलेचे माहेर घर समजेल जाणाऱ्या साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या खेळ्यांची मृदूंगावर थाप देव दिवाळी झाली कि पडते आणि नमनाला सुरवात होते. तसेच ही आपली लोककला सातासमुद्रापार पोहचवण्याच कार्य आणि सरकार दरबारी राजसश्रय मिळावा म्हणून काही आयोजक मंडळी आणि नमन प्रेमी करत आहे. त्यातीलच ऐक मंडळ म्हणजे नवलाई सेवाभावी संस्था (रजि ) ही संस्था आहे.
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी म्हणजे निसर्गाचा थाट, नमन कलेचे उगमस्थान. ह्याच कोकणातील नमन हौशी कलाकारांना सोबत घेऊन शाहिर श्री. भिकाजी भुवड (मास्तर) यांनी आई जीवदानी कला फाऊंडेशनची स्थापना केली. कला फाउंडेशन १५ वर्ष झाली असून रजिस्टर करून ७ वर्ष झाली. ह्या कालावधीत नमनाचे जवळजवळ ७० ते ८० प्रयोग करण्यात आले आहेत.
त्यातीलच एक प्रयोग शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ०८.०० वाजता मराठी साहित्य संघ गिरगाव येथे होणार आहे. आई जिवदानी कला फाऊंडेशन प्रस्तुत शाहीर श्री. भिकाजी ता. भुवड (मास्तर) निर्मीत हौशी कलावंत स्री पात्राने नटलेल बहूरंगी नमन. खास आकर्षण ,नमन कलेमधून “श्री. स्वामी समर्थां”चे दर्शन, सुमधुर गणातून श्री. सिद्धिविनायकाची आराधना, नटखट – विनोदी गौळण सह रहस्यमय कथेसोबत राधा कृष्णाच्या प्रेमलीलेचा सारीपाठ, रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मधुर संगीतमय गाणी, नवनवीन गौळणींचा थाट आणि सोबत पुरूष कलाकारांच्या जिवनावर आधारीत श्री. संजय पेजले यांच्या संकल्पनेतून आणि श्री. भिकाजी भुवड यांच्या लेखणीतून साकारलेले एक काल्पनिक वगनाट्य “महापुरूष”.
आपण सर्वानी या नमनकलेचा आनंद घ्यावा आणि नवलाई सेवाभावी संस्थेला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी आणि तिकीटसाठी चंद्रकांत आलीम- ९५९४९५३९५२, प्रमोद शिंदे – ९३२३८४३९३१, भरत वेलुंडे- ८२९१८५२६१६, शंकर सोलकर- ९८९२०८६४३१, निलेश दुर्गोळी- ९०८२२०९२९७, महेंद्र वेलुंडे-९००४२८४२९४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.