(रत्नागिरी)
मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावून ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दीपक बाबू तांडेल असे संशयिताचे नाव आहे.
हा प्रकार ६ मार्च ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रत्नागिरीत घडला. फिर्यादी नासीर अब्दुल गनी वाघू यांनी संशयित दीपक तांडेल याला २०२३-२४ वर्षाकरिता मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावू ५ लाख ४० हजाराची रक्कम दिली होती. मात्र, संशयित स्वतः व इतर कामगार यांच्यासह कामावर आला नाही. तसेच दिलेली रक्कम ही परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी नासीर वाघू यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयित दीपक तांडेल याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत भाटेत