(चिपळूण)
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना चालना देणेसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत दि.23 नोव्हेंबर 2023 ते दि.22 डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्हास्तरावर महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून सर्व आय.टी.आय. व विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये सह्याद्रि आय.टी.आय. सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी दैदित्यमान यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल प्रशिक्षणार्थी कु. स्वरूप नरेंद्र शिरगावकर व कु. हर्षल धनंजय मोरे यांनी CNG वाहनामध्ये जर CNG लिकेज झाला तर तो समजण्यासाठी CNG Leakage Detector ची संकल्पना PPT व मॉडेलद्वारे मांडून वाहनास होणारे अपघात (दुर्घटना) कशाप्रकारे टाळता येतील ही संकल्पना मांडली. तसेच रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर टेक्नीशियन प्रशिक्षणार्थी कु.मानस गावकर यांनी शेतामध्ये तयार होणाऱ्या नाचणी या पिकाची मळणी करुन नाचणी कणसापासून दाणे व्यवस्थित वेगळे होण्याच्या दृष्टीने नवीन टेक्नीक वापरुन शेतकऱ्यांना उपयुक्त असे नाचणी मळणी यंत्र बनविण्याची संकल्पना मांडली.
या दोन्ही नवसंकल्पनाची प्रथमत: जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग,रत्नागिरी यांचेकडुन या संशोधनांची राज्य पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यासाठी आय.टी.आय. निदेशकांंचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व त्याचबरोबर प्राचार्य, श्री.उमेश लकेश्री यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
दि.26 जानेवारी 2024 रोजी भारतीय 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी येथे झालेल्या समारंभामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना.श्री. उदयजी सामंत यांच्याहस्ते व श्री. एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी, श्री.कीर्ती पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी, पोलिस अधिक्षक, रत्नागिरी जिल्हा व श्रीमती.इनुजा शेख, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या दैदित्यमान यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखरजी गोविंदराव निकम, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेशजी मनोहर महाडिक, आय.टी.आय. व्यवस्थापन चेअरमन श्री.चंद्रकात भाऊराव सुर्वे, तसेच संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापन सर्व संचालक आणि आय.टी.आय. प्राचार्य श्री.उमेश लकेश्री व आय.टी.आय. मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संबंधीत विद्यार्थींचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.