(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुका पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांची 19 जाने.2024 रोजी बदली झाल्यानंतर सदरचे पद रिक्त होते आणि या ठिकाणी राजापूर तालुक्यातील नाट्याचे अविनाश केदारे यांच्याकडे राजापूर पोलीस स्टेशनंचा प्रभारी चार्ज होता.
आज पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांनी राजापूर पोलीस स्टेशनचा प्रॉपर चार्ज स्विकारल्यानंतर राजापूर पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर नाट्याचे प्रभारी अविनाश केदारे, राजापूर पोलीस उपनिरीक्षक श्री उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री शेख यांनी श्री फुलचंद मेंगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.