(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल या शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व जिल्हा परिषद रत्नागिरी चे माजी सदस्य राजेश सावंत यांचे वडील आणि माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांचे सासरे कै.कृष्णाजी सुभान सावंत यांचे वयाच्या 95 व्या वर्षी 29 जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने त्यांच्या परुळे तालुका राजापूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
परुळे गावातील सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेले कै.कृष्णाची सुभान सावंत यांचा जन्म 29 ऑगस्ट 1928 रोजीचा त्यावेळी ग्रामपंचायत अस्तित्वात आली होती. त्यावेळी ते परुळे तालुका राजापूर या ग्रामपंचायतचे सदस्य होते. त्यांचे चिरंजीव अरविंद सावंत यांनी देखील गावचे उपसरपंच पद भूषविले आहे.
वयाच्या 62 व्या वर्षी ते परळे गावचे सरपंच झाले. परुळे गावचे जवळपास पंधरा वर्षे सदस्य व वीस वर्ष सरपंच पद भूषवणारे परिसरातील ते एकमेव हस्ती होते. परिसरात सामाजिक कार्य करताना वयाच्या 52 व्या वर्षात त्यांचा राजकारणातील वावर इतका वाढला होता की राजकारणातील आप्पा पटवर्धन बॅरिस्टर नाथ पै.यांचे त्यांच्या घरी येणं जाणं होतं. मधु दंडवते भाई हातणकर यांच्याशी असलेली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.