चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘फिल्मफेअर.’ गुजरातमधील गांधी नगर येथे फिल्मफेअर पुरस्कार 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक चित्रपटांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. दोन दिवसीय पुरस्कार वितरण सोहळ्यात 28 जानेवारी 2024 रोजी मुख्य श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रणबीर कपूरला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला फिमेल वर्गात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार 12th Fail ला देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार 12th Fail चे दिग्दर्शनक विधू विनोद चोप्रा यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार देखील 12th Fail चित्रपटालाच गेला. अभिनेता विक्रांत मेसीला 12th Fail साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स फिल्मफेअर पुरस्कार विभागून देण्यात आला. अभिनेत्री राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे आणि शेफाली शाहला थ्री ऑफ अससाठी हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक्स फिल्मफेअर पुरस्कार जोराम यांना दिला गेला. रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी शबाना आझमी यांना सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार डंकीसाठी विकी कौशलला देण्यात आला.
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार देण्यात आला. तर सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲक्शनचा पुरस्कार मिळाला. विकी कौशलचा चित्रपट सॅम बहादूर सर्वोत्कृष्ट वेशभूषा श्रेणीत पुढे राहिला, तर याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइनचा पुरस्कारही मिळाला. इतकंच नाही तर बेस्ट प्रोडक्शन डिझाइनच्या कॅटेगरीत सॅम बहादूरने बाजी मारली आहे. रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईनच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. कार्यक्रमाचा शनिवार मुख्यतः तांत्रिक श्रेणीतील पुरस्कारांच्या नावे राहिला. शाहरुख खानचा चित्रपट जवान, रणबीर कपूरचा चित्रपट ॲनिमल आणि विकी कौशलचा चित्रपट सॅम बहादूर यांनी या श्रेणीत बाजी मारली.
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन
कुणाल शर्माच्या ‘सॅम बहादुर’ला आणि ‘अॅनिमल’ला हा पुरस्कार मिळाला
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर
अॅनिमल चित्रपट
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
सुब्रत चक्रवरती आाणि अमित रे यांच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला
सर्वोत्कृष्ट एडीटिंग
12 वी फेल साठी विधु विनोद चोप्रा आणि जसकुंवर सिंह कोहली यांना हा पुरस्कार मिळाला
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
रेड चिलिज वीएफएक्स ‘जवान’ला पुरस्कार देण्यात आला
सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिझाइन
सॅम बहादूर या चित्रपटासाठी सचिन लवलेकर, निधी गंभीर आणि दिव्या गंभीरला हा पुरस्कार देण्यात आला
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
थ्री ऑफ अस या चित्रपटासाठी अविनाश अरुण धावरे
सर्वोत्कृष्ट कोरियओग्राफी
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील व्हॉट झुमकासाठी गणेश आचार्यला हा पुरस्कार देण्यात आला
सर्वोत्कृष्ट अॅक्शन
जवान चित्रपटासाठी स्पायरो रजाटोस, एनल अरासु, यानिक बेन, क्रॅग मॅक्रे, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स
इतर पुरस्कार
1954 साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. 2005 साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे 11 पुरस्कार मिळाले होते.