(नवी दिल्ली)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला मोदी सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री अशा एकूण १३२ जणांचा सन्मान करण्यात आला आहे. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण देण्यात आला असून अभिनेते मिथुन चक्रवर्ती, राम नाईक, आदिना पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,चिरंजिवी, अभिनेत्री वैजंयतीमाला बाली, ब्रिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि प्रसिद्ध नृत्यागंणा पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ११ पुरस्कार विजेत्यांची यादी –
- होर्मुसजी एन कामा – पद्मभूषण पुरस्कार (साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता)
- अश्विन बालचंद मेहता – पद्मभूषण पुरस्कार ( वैद्यकीय)
- राम नाईक – पद्मभूषण पुरस्कार (सामाजिक कार्य)
- दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त – पद्मभूषण पुरस्कार (कला)
- कुंदन व्यास – पद्मभूषण पुरस्कार ( साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता)
- उदय विश्वनाथ देशपांडे – पद्मश्री पुरस्कार –(क्रिडा)
- मनोहर कृष्णा डोळे – पद्मश्री पुरस्कार ( वैद्यकीय)
- जहिर काझी – पद्मश्री पुरस्कार ( साहित्य आणि शिक्षण)
- चंद्रशेखर महादेवराव मेश्राम – पद्मश्री पुरस्कार ( वैद्यकीय)
- कल्पना मोरपरिया – पद्मश्री पुरस्कार (व्यापार आणि उद्योग)
- शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर – पद्मश्री पुरस्कार ( सामाजिक कार्य)