(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आले आहे या कार्यकारणीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक सेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख तथा गुरुवर्य प्रकाश गुणाजी पवार यांची यांची बिनविरोध सर्वानुमते निवड झाली आहे. तर चिटणीसपदी रोहित राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कार्यकारणीच्या उर्वरित पदांमध्ये उपाध्यक्ष म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते भारत सिताराम पवार यांची नियुक्ती तर उपचिटणीसपदी मयुरेश मारुती पवार, कोषाध्यक्षपदी सुशील सदानंद पवार, हिशोब तपासणीसपदी रविकांत सोनू पवार, सल्लागार म्हणून शाखेचे माजी चिटणीस वैभव पवार आणि दिवाकर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीच्या नव्या कार्यकारणीला शुभेच्छा देण्यासाठी सर्व माजी पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी व सभासद बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचैतना बुद्धविहारात झालेल्या विशेष जनरल सभेमध्ये या नवीन कार्यकारणीच्या हाती पदभार सुपुर्द करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी दोन्ही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मनोगतामध्ये शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पवार यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण वाडीवस्तीचा विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देणार असल्याचे सांगितले. आपल्यावर दाखवलेला विश्वास संपादन करून सभासदांना अत्यंत चांगले काम करून दाखविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.