(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड पंचक्रोशी मैदानी स्पर्धेत जिंदल विद्यामंदिर रत्नागिरी प्रशालेने यश संपादन केले आहे. या स्पर्धा नुकत्याच जयगड शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलगे व मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये कु. संचित जाधव याने 200मी प्रथम, गोळाफेक तृतीय कु. राधेय मयेकर100 मी. प्रथम, कु. सुमेध राऊत 2000 मी. तृतीय कु. अक्षरा निकम गोळाफेक द्वितीय कु. मृगजा हळदणकर, 200 मी. तृतीय 17 वर्ष खालील मुलगे व मुलींमध्ये कु. अवेस गुहागरकर थाळीफेक द्वितीय कु. अमरी शेख 100 मी. द्वितीय कु. मानसी घाटगे,व गोळा फेक द्वितीय अशाप्रकारे यश संपादन केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रिडा शिक्षक रणजित जाधव, मिथिला मोरे व विनोद पिल्लाई यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वराठे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पेद्दना यांनी आणि शाळेतील शिक्षकवृंदानी विशेष अभिनंदन केले.