(रत्नागिरी)
दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्ष जीएनएम परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये मिसबाह मेहबूब मोगल (७३ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय कीर्ती दत्ताराम लांबोरे (७० टक्के) आणि तृतीय जान्हवी राजा काजवे (६८ टक्के) यांनी यश मिळवले. या विद्यार्थिनींचे अभिनंदन दी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळासाहेब माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, मिहिर माने, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्र. प्राचार्य रमेश बंडगर आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
दरम्यान, एमएएच बीएसस्सी नर्सिंग सीईटी २०२४, एमएएच एएनएम, जीएनएम सीईटी २०२४ (नवीन) याच्या प्रवेशाला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. बीएसस्सी नर्सिंगकरिता १२ वी विज्ञान व एएनएम-जीएनएमसाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा ७ मे दरम्यान होईल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व माहिती शैक्षणिक कागदपत्रांनुसार अचूक भरावी. सीईटी नोंदणी, परीक्षा व वेळोवेळी येणाऱ्या प्रवेशासंबंधी सूचनांसाठी http://www/mahacet.oerg/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. सीईटी २०२४ विद्यार्थी नोंदणी, परीक्षा व अधिक माहितीसाठी दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, विमानतळासमोर, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
नर्सिंगमध्ये रुग्णसेवा करण्याची संधी आणि चांगले वेतनही मिळते. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठीही नर्सिंग हे उत्तम क्षेत्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सीईटी द्यावी व नर्सिंगसाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन दी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे करण्यात आले आहे.