(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी- खालगाव येथे पूजा कमिटी, सर्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळ तसेच ऑल जाकादेवी पुरस्कृत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला असून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जाकादेवी येथील उद्योजक व व्यावसायिक श्री. सुधीर पर्शुराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये , उपसरपंच कैलास खेडेकर, उद्योजक रोहित कोळवणकर, देणगीदार सागर गोताड, अरुण गोताड, ओरीचे माजी उपसरपंच बंड्या देसाई, राकेश खेऊर, मयुरेश देसाई, किसन नेवरेकर, प्रसाद देसाई, सुरेश कातकर, बंटी सुर्वे, सतिश देसाई, पंच प्रमुख संदेश चव्हाण, सुरेश रणदिवे, वृत्तलेखक संतोष पवार, समालोचक श्री.आंबेकर, पराग महाडिक, जाकादेवी ऑल कमिटीचे सर्व सदस्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेमध्ये १६ संघाने सहभाग घेतला असून या स्पर्धेचा सांगता समारंभ गुरूवारी संपन्न होणार आहे. गुरुवार दि १८ रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वा. लहान मुलांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुजा कमिटी, नवरात्र उत्सव मित्रमंडळ तसेच ऑल इंडिया यांचे पदाधिकारी कार्यकर्ते क्रीडाप्रेमी नागरिक मेहनत घेत आहेत.
स्पर्धेसाठी भाजपा युवा तालुकाध्यक्ष प्रतिक सुधीर देसाई यांनी तालुका विजेत्या संघाला ११ हजार १११/- रुपयांचे पारितोषिक तर सागर गोताड आणि अरुण गोताड यांनी आपले वडील कै.मोहन गुणाजी गोताड यांच्या स्मरणार्थ ७ हजार ७७७/- चे रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे .याशिवाय परिसरातील दानशूर व्यावसायिक, क्रीडाप्रेमी यांनी वैयक्तिक बक्षीसही घोषित करण्यात केली आहेत.अनेक क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्पर्धेसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
या तीन दिवसीय स्पर्धा सायंकाळच्या वेळी प्रकाशझोतात खेळवल्या जात आहेत .कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान लाभत आहे. गुरूवारी अंतिम सामने होणार असल्याने खालगाव नं. ३ शाळेच्या मैदानात क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्वागत समारंभाचे सूत्रसंचलन सुरेश रणदिवे यांनी केले.