(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावातील आमदार शेखर निकम यांच्या विकास निधीतील जिल्हा वार्षिक योजना, २५१५ योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजनांतून मंजूर केलेल्या तुरळ रावळवाडी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे, तुरळ गुरववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तुरळ डिकेवाडी रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
तुरळ गावचे सरपंच सहदेव सुवरे व ग्रामस्थांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. आमदार शेखर निकम यांनी आमदार होण्यापूर्वी तुरळ गावात अनेक विकास कामे केली होती. यामुळे गावातील जनमानसात त्यांच्या प्रति आपल्या कुटुंबातील सदस्य असल्या भावना आहे. गेली अनेक वर्षांपासून गावातील रस्त्यांची रखडलेली रस्त्यांची कामे होण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार निकमांकडे मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत ग्रामस्थांची होणारी अडचण पाहता आपल्या विकास फंडातून सदर कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले व सदैव त्यांच्या सोबत राहून आगामी काळात होणा-या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य आमदार शेखर निकम यांना देवून विजयी करणार असे सांगितले.
यावेळी राजेंद्र सुर्वे, सरपंच सहदेव सुवरे, संतोष जाधव, उत्तम जाधव, दत्ता ओकटे, संतोष भडवळकर, मारुती देसाई, कमलाकर देसाई, मनोहर पाचकले, प्रभाकर तांबे, मनोहर जाधव, रमेश डिके, जानू डिके, दिलीप म्हादे, वसंत गुरव, उदय मोहिते, चंद्रकांत तुरळकर, संदीप चरकरी, बाळकृष्ण डिके, गणपत पवार, अरविंद गुरव, धोंडू डिके, जानू डिके, पांडुरंग डिके, रमेश डिके, अरविंद जाधव, प्रभाकर तांबे, दिलीप म्हादे, संतोष जाधव, चंद्रकांत तुरळकर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.