(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नविन- नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल या साठी प्रयत्नशील असते. शैक्षणिक ज्ञानाबरोबर आजच्या नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती कशी जपता येईल आणि पुढे नेता येईल यासाठी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमातून त्यांची संस्कृती जोपासली जाते.व विद्यार्थ्यांना नवीन कामासाठी प्रोत्साहित करण्यात येते. याच कलामहाविद्यालयातील मूलभूत अभ्यासक्रम प्रथम वर्ष मधे शिकत असणारा कु. शुभम दिलीप जाधव हा विद्यार्थी मूळचा माणगाव येथील असून राम भक्त आहे.
येत्या २२ जानेवारी २०२४ दिवशी अयोध्या येथे होणाऱ्या राममंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे औचित्य साधून रस्त्यावरील एका साध्य पाषाणावर अयोध्या मंदिराचे चित्र काढले आहे. हे पाषाणावरील चित्र १५ जानेवारी २०२४ या दिवशी सुरु होणाऱ्या वार्षिक कलाप्रदर्शनात प्रदर्शित करणार आहे. या चित्राचे मूल्य त्याने ५०००/- ठेवले आहे. तरी ज्या कोणाला हे चित्र पाहावयाचे व विकत घेयायचे असल्यास सावर्डे वहाळफाटा येथील गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे हे प्रदर्शन होणार आहे तरी जास्तीत जास्त कलारसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .