(रत्नागिरी)
गेली 7 वर्षे सतत सामाजिक कार्य करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रूग्ण मदत केंद्राचे स्थलांतर अत्याधुनिक केबीन मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी बिल्डिंग, तळमजला, रत्नागिरी येथे करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे डीन डॉ रामानंद साहेब यांचे हस्ते नवीन रुग्ण मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक डीन डॉ वाघ सर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सौ फुले मॅडम, वैद्यकीय महाविद्यालय चे वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, सेवक उपस्थित होते.
प्रारंभी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी स्वागत करून रुग्ण मदत केंद्राचे कार्याबाबत माहिती दिली.यावेळी डीन डॉ रामानंद यांनी एनजीओ च्या कामाचे कौतुक करून आता हे रुग्ण मदत केंद्र हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय जिल्हा रुग्णालय यांच्या साठी काम करेल आणि संस्थेला सर्वतोपरी मदत करु असे अभिवचन दिले.यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.