(रत्नागिरी)
दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता रत्नागिरी मधून अष्टविनायक दर्शन बस सेवा सोडण्यात येणार आहे. यासठी प्रवास भाडे फक्त १८००/- आहे. सदर बसला महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट दरात ५०% सवलत व वय वर्षे ७५ वरील नागरीकांना अमृत जेष्ठ नागरिक योजनेअंतर्गत प्रवास भाड्यात १००% सवलत उपलब्ध आहे.
सदर बस चा मार्ग – २६ जानेवारी २०२४ रात्री ११:३० वाजता रत्नागिरी मधून मोरगाव कडे मार्गस्थ, दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत मोरगाव येथे पोहोचेल ( येथे अंघोळ करून दर्शन सुरू होईल ) मोरगाव येथून बस थेऊर कडे मार्गस्थ होईल. थेऊर वरून सिद्धटेक कडे रवाना होईल ( जेवणाच्या वेळेनुसार थेऊर किंवा सिद्धटेक येथे दुपारचे जेवण) सिध्दटेक वरून रांजणगाव येथे रवाना रांजणगाव येथून दर्शन घेऊन ओझर येथे मुक्कामी. दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ओझर येथून लेण्याद्री कडे रवाना. लेण्याद्री येथून राजगुरुनगर,चाकण,लोणावळा मार्गे (दुपारचे जेवण वेळेनुसार शक्य तेथे होईल)
महड येथील वरदविनायक गणपती तेथून पाली बल्लाळेश्वर येथे पोहोचेल व तेथून रत्नागिरी साठी परतीचा प्रवास सुरू होईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रवासी मित्र सोहम बापट 8275065848, आगार व्यवस्थापक संदिप पाटील 7588193774, स्थानक प्रमुख भाग्यश्री प्रभुणे मॅडम 9850898327 यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.