(मुंबई)
मुंबईतील साकीनाका येथून 9 कोटी रुपयांच्या कोकेन जप्त केले असून पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केले आहे. 6 जानेवारी रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास पोलिसांना साकीनाका येथे एक संशयित व्यक्ती दिसला होता त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश साकिनाका पोलिसांनी केला. जोएल अलेजांद्रो व्हेरा रामोस (19) रा. ( व्हेनेझुएला) आणि डॅनियल नेमेक 33 (नायजेरियन) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 जानेवारीला पोलिसांनी साकिनाका येथून एका संशयित व्यक्तीचा पाठलाग केला. पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेत कोकेनच्या 88 कॅप्सूल सापडल्या. पोलिसांनी या कोकेन जप्त करून घेतल्या. अटक केलल्या व्यक्तीची चौकशी दरम्यान सांगितले की, कोकेन साकीनाका येथील ड्रीम रेसिडेन्सी हॉटेलमध्ये राहणाऱ्या जोएल अलेजांद्रो वेरा रामोसकडून आणला होता. या गुप्त माहितीवरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून रामोसला अटक केली. रामोसने पोलिसांना सांगितले की त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले आणि ते ब्राझील येथून इथिओपियामार्गे नेले.
साकीनाका पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अटक केली, आरोपींकडे कोकेन जप्त केले आहे. दोन्ही व्यक्तींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हे अंमली पदार्थ आफ्रिकन कुरिअरद्वारे भारतात आणले जात होते आणि त्यानंतर ते मुंबईतील मुख्य वितरकाकडे सुपूर्द केले जात होते अशी माहिती चौकशीत दिली.